नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करणाऱ्यांची संख्या दुप्पट,

गेल्या दोन वर्षांत हा उत्सव थाटात साजरा झाला नसल्याने यावर्षी ज्योत प्रज्वलित करणाऱ्यांची संख्या वाढेल या अपेक्षेने संस्थानाकडून विशेष नियोजन आखण्यात आले आहे

नागपूर दिनांक 13 सप्टेंबर : - श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर, कोराडी येथील अश्विन नवरात्रोत्सवाच्या पूर्व तयारीला वेग आला असून, यंदा मोठ्या संख्येने भाविक या उत्सवाला भेट देतील असा अंदाज संस्थानाकडून व्यक्त करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाचे संकट निवळले असल्याने अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करणाऱ्या भक्तांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याची माहिती संस्थानाकडून देण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या आढावा बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. संस्थानाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला उपाध्यक्ष नंदुबाबू बजाज, सचिव श्री दत्तू समरितकर, सहसचिव श्रीमती प्रभा निमोने, कोषाध्यक्ष सुशीला मंत्री यांच्यासह विश्वस्त ऍड श्री मुकेश शर्मा, श्री अजय विजयवर्गीय, श्री केशवमहाराज फुलझेले, श्री बाबुराव भोयर, श्री प्रेमलाल पटेल, श्री अशोकबाबू खानोरकर, श्री लक्ष्मीकांत तडस्कर प्रामुख्याने उपस्थित होते. श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर कोराडी येथील अखंड मनोकामना ज्योत गेल्या ५० वर्षांपासून प्रज्वलित होत असल्याने नागपूरकरांमध्ये त्याबाबत वेगळी आस्था आहे. दरवर्षी ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील भक्त कोराडी मंदिरात पोहोचतात. गेल्या दोन वर्षांत हा उत्सव थाटात साजरा झाला नसल्याने यावर्षी ज्योत प्रज्वलित करणाऱ्यांची संख्या वाढेल या अपेक्षेने संस्थानाकडून विशेष नियोजन आखण्यात आले आहे. नागरिकांनी अश्विन नवरोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन आई दगदंबाचरणी सेवा समर्पित करावी असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे . (दि.13 सप्टेंबर 2022)