नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

आदिवासी विद्यार्थ्यांचा नामांकित इंग्रजी माध्यम शाळेच्या शिक्षणापासून वंचित करुन दिशाभूल !

मा.अप्पर आयुक्त ठाकरेंना आदिवासी विकास विभाग नागपूर यांना गोंडवाना गणतंत्र पार्टी, गोंगपा महीला प्रकोष्ठ, गोंगपा युवा मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले

आदिवासी विद्यार्थ्यांचा नामांकित इंग्रजी माध्यम शाळेच्या शिक्षणापासून वंचित करुन दिशाभूल नागपूर, दिनांक 13 सप्टेंबर रोजी आदिवासी प्रकल्प विकास विभाग नागपुर यांच्याद्वारे नामांकित इंग्रजी माध्यम शाळेची यादी तात्काळ लावण्या बाबत मा.अप्पर आयुक्त ठाकरेंना आदिवासी विकास विभाग नागपूर यांना गोंडवाना गणतंत्र पार्टी, गोंगपा महीला प्रकोष्ठ, गोंगपा युवा मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व आदिवासी प्रकल्प विकास विभाग नागपूर यांच्या द्वारे आदिवासी समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत आदिवासी समाजाच्या मुलांना प्रवेश देऊन त्यांना मोफत शिक्षण दिले जाते. परंतु शैक्षणिक वर्ष 2022-2023 संपत आले असून अजुन नामांकित इंग्रजी माध्यम शाळेची यादी लागली नाही. मागील महिन्यात दिनांक 23/8/2022 रोजी निवेदन देण्यात आले व दिनांक 1/9/2022 रोजी प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाचा घेराव केला असता त्याच दिवशी अप्पर आयुक्त ठाकरे साहेबांची मुबंई मंत्री मंडळाशी नामांकित शाळेविषयी बैठक असल्याचे सांगुन तारीख देण्यात आली पण त्यानंतर ही आजपर्यंत कोणतेही धडपड करण्यात आली नाही. व आजच्या चर्चा दरम्यान सुध्दा अप्पर आयुक्त ठाकरे साहेबांनी दिनांक 14/9/2022 रोजी मंत्री मंडळाशी नामांकित शाळेविषयी बैठक असल्याचे सांगितले, असे निदर्शनास येते की, शासनाद्वारे तारीख वर तारीख देऊन विद्यार्थ्यांचे संविधानीक शैक्षणिक अधिकाराचे हनन होत असून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा षडयंत्र रचलेला आहे. जर 7 दिवसात आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक आणि आदिवासी विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे नामांकित इंग्रजी माध्यम शाळेची यादी जाहीर केली नाही तर गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि संपूर्ण पालक मंडळी सह तिव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अॅड. आशिष उके (प्रदेश प्रवक्ता) दिनेश सिडाम (शहर अध्यक्ष)राजेश ईरपाते (युवा प्रदेशाध्यक्ष)विठ्ठल उईके (संपर्क प्रमुख)प्रतिमा मडावी (प्रदेश अध्यक्ष म.प्रकोष्ठ) गंगा टेकाम (जिल्हा अध्यक्षा म.प्रकोष्ठ) सौरभ मसराम (युवा जिल्हा अध्यक्ष)आशाताई मसराम (जिल्हा उपाध्यक्ष) सुनीता ऊईके (जिल्हा संघटक म. प्रकोष्ठ) योगिता मसराम (शहर अध्यक्षा म.प्रकोष्ठ) प्रविण मडावी (युवा जिल्हा उपाध्यक्ष) स्वप्निल सिरसाम, विनोद उईके, क्रिष्णा सरोते, राजु कुकुरडे, रवि घोडाम, लंकेश ऊईके, हिमांशु धुर्वे, गणेश परतेकी, दिपाली ऊईके, श्रीकृष्ण मसराम, चंद्रशेखर जामगडे, प्रभु मसराम, अशोक पोयाम, सचीन मसराम, समस्त कार्यकर्ते व पालकवर्ग उपस्थित होते. (दि.13 सटेंबर 2022)