नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

जेष्ठ गझलकार नीलकांत ढोले यांचं निधन

जेष्ठ गझलकार चित्रकार साहित्यीक, हृदयस्पर्शी, गझल लेखनातून काव्य रसिकांच्या मनात घर करणारे कवी नीलकांत ढोले यांचे वृध्दपकाळाने

नागपूर - हिंगणा, ता १७ सप्टेंबर :- विदर्भातील जेष्ठ गझलकार चित्रकार साहित्यीक, हृदयस्पर्शी, गझल लेखनातून काव्य रसिकांच्या मनात घर करणारे कवी नीलकांत ढोले यांचे वृध्दपकाळाने शनिवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. आज (१७ सप्टेंबर) साईनगर येथील मधुबन या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. कविवर्य नीलकांत ढोले यांच्या आतापर्यंत अग्रीबन, कळा काळजाच्या वेदनांची वेधशाळा आदी गझल संग्रह तर मातीतील माणसं चांदनीचा काटा हे व्यक्ती चित्रण संग्रह व ऋतूंचे सोहळे हा ललीत संग्रह प्रकाशित झाले आहेत. रीकामगीरी हे पुस्तक त्यांच्या आजारपणामुळे अप्रकाशित राहुन गेले. त्याचप्रमाणे ते एक उत्कृष्ट चित्रकारही होते.कवीवर्य नीलकांत ढोले अनेक मुशायरांमधून रसिकांची मने जिंकली आहेत. शिक्षकाची नोकरी करुन त्यांनी साहित्य क्षेत्रात बहुमुल्य योगदान दिले. मास्को रेडिओ वरुन त्यांच्या कवितांचे सादरीकरण झाले आहे. सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्याशी निकटचा संबंध होता. पार्श्वगायक सुरेश वाडकर व गझलनवाज भिमराव पांचाळे यांनी त्यांच्या गझलेला स्वरबद्ध केले. त्यात त्यांची महाराष्ट्रात गाजलेल्या गजलांमध्ये. प्रत्येक सोसलेला आघात याद आहे ! नाबाद राहिलेला मी सिंदबाद आहे ! मी हिशेब करता करता थंडगार झालो.! आपल्याच आयुष्याचा कर्जदार झालो.! जे इथे घेऊनी आलो. द्यायचे राहून गेले ! काय जे होते मनी ते व्हायचे राहून गेले. ! या गझला विशेष गाजल्या. वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत गझलेवर निस्सिम प्रेम करणारा जिंदादिल कवी या जगाला सोडून गेल्याने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे एक मुलगा दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. आज डिगडोह येथील स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि मोठा मित्र परिवार उपस्थित होता.(दि.17 सप्टेंबर 2022)