नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नगरपरिषद वानाडोंगरी च्या सभापती पदाची निवडणूक शांततेत पार पडली

नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी व मुख्याधिकारी भारत नंदनवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत

नागयूर - हिंगणा.ता 20सप्टेंबर:- नगरपरिषद वानाडोंगरी च्या विषय सभापती पदाची निवडणूक शांततेत पार पडली. नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी व मुख्याधिकारी भारत नंदनवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत, नितीन काळे -बांधकाम , शुभम गोहाड -पाणीपुरवठा ,अनिता गुप्ता -नियोजन,रेखाताई बडोदेकर- शिक्षण तर प्रमिला यादव यांची महिला व बालकल्याण सभापती पदी निवड करण्यात आली तर नगरसेविका सुलोचना झाडे यांची महिला व बालकल्याण उपसभापती पदी नियुक्ती करण्यात आली .उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता यांच्याकडे आरोग्य सभापतीची जबाबदारी देण्यात आली . नितिन काळे यांचा या पंचवार्षिक मध्ये चौथ्यांदा सभापती पदाकरिता निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंद बघायला मिळाला. सर्व नवनियुक्त सभापतींचे नगराध्यक्ष वर्षा ताई शहाकार ,उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता,गटनेते बालू मोरे व उपस्थित नगरसेवक गुणवंत मते ,वीरेंद्र यादव ,नितिन साखळे, भागवत काळे, संतोष कुंभरे, वंदना मुडे ,ललिता राऊत, चंदा अजमेरे, पुष्पा भालेराव,छाया कराडकर आदींनी पूष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.या नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे.२१ पैकी १९ नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे शांततेत पार पडली.(दि.20सप्टेंबर 2022)