नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

एस.बी.सिटी कडून खेळताना साईश भिसे याच्या नाबाद ९९ धावा

प्रथम फलंदाजी करतांना साईश भिसे यांनी नाबाद ९९ (८८) धावा काढल्या त्याच्या तुफानी फटकेबाजीत

नागपूर : स्थानिक स्पर्धेत एस.बी.सिटी विरुद्ध रुबी स्पोर्टिंग क्लब दरम्यान एस.बी.सिटी महाविद्यालयाच्या प्राणांगनात सामना रंगला होता. एस बी सिटी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना रुबी स्पोर्टिंग क्लब संघासमोर जिंकण्यासाठी ४० षटकामध्ये २१२ धावांचे लक्ष ठेवले होते. प्रथम फलंदाजी करतांना साईश भिसे यांनी नाबाद ९९ (८८) धावा काढल्या . त्याच्या तुफानी फटकेबाजीत १५ चौकाराचा समावेश होता. अथर्व बेलसरे - १८ धावा, राजस वैद्य - १५ (३४) धावा काढल्या - अनुकल्प वानखेडे व दिव्यांश मिश्रा याने प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात रुबी स्पोर्टिंग क्लब यांनी धावांचा पाठलाग करतांना ३८.३ षटकामध्ये १६८ धावावर सर्वबाद झाले. रुबी स्पोर्टिंग क्लब संघाकडून रांधित्य सिंग- यांनी सर्वाधिक ५२ (६७) धावा काढल्या -पूर्वेश माथणकर यांनी३३ तर वेदांत सीरिया यांनी ३२ धावा काढून बाद झाले. अमन चंभारे यांनी २७ रन देवून दोन गडी बाद केले. सरतेशेवटी एस. बी. सिटी संघ ४४ धावांनी विजयी झाला. सामनावीर म्हणून साईश भिसे यांना एस. बी.सिटी चे मालक मनीष मिश्रा यांच्या तर्फे बक्षीस देण्यात आले. (दि.4 नोव्हेंबर2022)