नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

अब्दुल सत्तरांच्या विरोधात हिंगण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रवादी च्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज हिंगण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष आशिष पुंड यांच्या नेतृत्वात आंदोलन

नागपूर - हिंगणा ता.8 नोव्हेंब्र :- राज्यातील शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादी च्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज हिंगण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष आशिष पुंड यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. रा. यु. काँ. प्रदेशाध्यक्ष महबूब शेख व   नागपूर विभाग कार्याध्यक्ष  नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनात  नागपूर जिल्हा (ग्रा) जिल्हाध्यक्ष आशिष पुंड व  हिंगणा शहर  अध्यक्ष मंगेश झिले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या  नेत्या,संसदरत्न व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर  शिंदेंच्या मंत्री मंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली टीका ही निषेधार्थ आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी पुंड यांनी दिली.आज सकाळी ११ वाजतानिमित्य हिंगणा  येथे,  श्री छत्रपती शिवाजी महाराज  च्या पुतळ्या समोर मंत्री अब्दुल सतार याच्या फोटोला  चपल मार आंदोलन  करण्यात येत आले.यावेळी   जिल्हा परिषदच्या माजी सभापती उज्ज्वला  बोढारे  पंचायत समितीच्या माजी सभापती रुपाली  खाडे,नगरपंचायत गट नेते गुणवंता चामाटे तालुका अध्यक्ष प्रवीण   खाडे,नगर सेवक दादाराव इटनकर शहर अध्यक्ष अनुप डाखोळे,सुरेश शेंडे,मनोज   भाकरे,कोठे , पुरुषोतम चौधरी,अजय कठाणे, मंगेश शेंडे, उदेश उमाटे,शुभम चंदणकर, हर्षद नंदनवार, योगेश झिले,प्रफुल काकडे, कुणाल चामाटे,अभिजित चामाटे, विवेक हुलके,सुरज यादव, जगदीश खुजे,सुमित वानखेडे,भुनेश ठाकरे,अनिकेत चामाटे,सुमित झिले व  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते! (दि .8 नोव्हेंबर 2022)