नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

खासदार सांस्‍कृतिक महोत्सव कार्यक्रम स्‍थळाचे भूम‍िपूजन व कार्यालयाचे उद्घाटन थाटात

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव येत्‍या,दिनांक.2 ते11 डिसेंबर 2022 दरम्‍यान हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजन

देशभरात गाजणार खासदार सांस्‍कृतिक महोत्सव – आ. मोहन मते , कार्यक्रम स्‍थळाचे भूम‍िपूजन व कार्यालयाचे उद्घाटन थाटात नागपूर, 16 नोव्‍हेंबर 2022, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेला खासदारा सांस्‍कृतिक महोत्‍सव देशभरात गाजणार असून त्‍याच्‍या यशस्‍वीतेसाठी सर्वांनी प्रयत्‍न करावे, असे आवाहन आमदार मोहन मते यांनी केले. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीच्‍यावतीने खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव येत्‍या, दिनांक 2 ते 11 डिसेंबर 2022 दरम्‍यान हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजन करण्‍यात आले आहे. या महोत्‍सव स्‍थळाचे भूमिपूजन आ. मोहन मते व माजी खासदार श्री अजय संचेती यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले व आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्‍थ‍ित होते. खासदार सांस्‍कृतिक महोत्सवाचे यंदाचे हे सहावे आयोजन आहे. स्‍थानिक कलाकारांसह राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्‍या कलावंतांचे विविध मनोरंजक, प्रबोधनात्‍मक कार्यक्रम सादर होतील. यावेळच्‍या महोत्‍सवात गायन, वादन, कविसंमेलन, महानाट्य, लाईव्‍ह कॉन्‍सर्टचे आयोजन करण्‍यात आले आहे. मुख्‍य कार्यक्रमाच्‍या आधी अर्धा तास स्‍थानिक कलावंत आपली कला सादर करणार आहेत. त्‍यानिमित्‍ताने स्‍थानिकांना या राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्‍या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा भाग होता येईल, असे मत प्रा. अनिल सोले यांनी प्रास्‍ताविक करताना सांगितले. प्रा. राजेश बागडी यांनी आयोजन व्‍यवस्‍थेचा आढावा घेतला. दरदिवशी एक लाख लोकांना जोडण्‍याचा यामाध्‍यमातून प्रयत्‍न राहील असे ते म्‍हणाले. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या सफलतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे.( दि.16 नोव्हेंबर 2022)