नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागपूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामे मार्गी लागणार - आमदार जयस्वाल यांनी केली उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक झाली. यावेळी आमदार आशीष जयस्वाल यांनी त्यांच्याशी विविध प्रलंबित विकासकामे याबाबत चर्चा केली.

रामटेक दि.२२नोव्हेंबर :- रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित विकासकामे व नागपूर जिल्ह्यातील विविध विषयांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक झाली. यावेळी आमदार आशीष जयस्वाल यांनी त्यांच्याशी विविध प्रलंबित विकासकामे व निधीची अडचण याबाबत चर्चा केली.यावेळी बैठकीत संत चोखामेळा शासकीय वसतिगृह बांधकाम पूर्ण करणे, एन.एम. आर. डी.ए. अंतर्गत मंजुर घरकुलांकरिता निधी उपलब्ध करून देणे स्वदेश दर्शन योजनेमध्ये रामटेक तिर्थ व पर्यटन क्षेत्राचा समावेश करणे,जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जागेवर महिला बचत गटांकरिता दुकान गाळे बांधकाम करणे पंचायत समिती,रामटेक येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम मंजुर करणे घाटपेंढरी ता. पारशिवनी येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पदे मंजूर करणे, ब वर्ग पर्यटन स्थळ विकास कार्यक्रम अंतर्गत प्रस्तावित परमात्मा एक आश्रम, पावडदौना, ता. मौदा येथील रुपये ४४.९२ कोटी विकास आराखड्यास मंजूरी देणे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सुधारणा करणे, मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे उद्भवलेल्या पाण्याच्या समस्यांवर उपाययोजना करणे, पेंच प्रकल्पाच्या रू. १६८६ कोटी प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे खिंडसी पूरक कालव्याचे दायित्व निधी उपलब्ध करून देणे ग्रामपंचायत कांद्री ता. पारशिवनी ला नगरपंचायत दर्जा देण्याकरिता प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली असून अंतिम अधिसूचना जाहीर करणे व सर्व आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळूचे मोफत रॉयल्टी पासेस उपलब्ध करून देणे या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. दि.22 नोव्हेंबर 2022