नागपूर,दिनांक.12 डिसेंबर :- हिंगणा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा 82 वा वाढदिवस माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या निवासस्थानी नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर ग्रामीण तर्फे कार्याध्यक्ष राजभाऊ राऊत यांनी शरदचंद्र पवार साहेबांचे ज्येष्ठ व निष्ठावंत सहकारी म्हणून रमेशचंद्र बंग यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ अभय महाकाळकर, राकापा नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजू राऊत, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गट नेते दिनेश बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव अव्हाळे, राकापा महिला जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे, राकापा हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे,राकापा नागपूर ग्रामीणचे उपाध्यक्ष विनोद हरडे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावळे, उपसभापती उमेश राजपूत, प.स सदस्य सुनील बोंदाडे, अनुसया सोनवणे, प्रमोद बंग, विठ्ठलराव कोहाड, इनायतुल्ला शेटे ,हिंगणा न.प गटनेते गुणवंता चामाटे, नगरसेवक प्रवीण घोडे,शशिकांत थोटे,श्यामबाबू गोमासे,राजेंद्र गोतमारे, रामभाऊ महल्ले, महेश बंग,उत्तम दास, सतीश मिनियार, सुरेश कैकाडे,रवींद्र देशमुख,हरीश बंग, लीलाधर दाभे,दीपावली कोहाड, पदम सिंह दीक्षित, इंदुबाई आलम, ज्योत्स्ना कांबळे, प्रेमलाल भलावी, उषा नंदनवार, मुकेश कथलकर, अनिशा शेख, हरीश नागपुरे, सुनिता नागपुरे, दीपमाला बेलोरे,सिराज शेटे ,मुकेश कटारे, शोभा राठोड, जावेद महाजन, गायत्री लारोकर, रंजना दुरबुडे, निकेश धार्मिक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येत उपस्थित होते.
दि.12 डिसेंबर 2022