नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

मनसे पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन पदनियुक्ती सोहळ्यात सर्वप्रथम दक्षिण पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र देऊन पदग्रहण सोहळा साजरा करण्यात आला

नागपूर : दि. २४ डीसेंबर :- दक्षिण पश्चिम विभाग क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुषार गिऱ्हे यांची ऑक्टोंबर महिन्यातच मा.राज साहेब ठाकरेंनी मुंबई शिवतिर्थ येथील नागपूर दक्षिण पश्चिम विभागातील विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मा.राज साहेब ठाकरे यांनी नागपूर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन पदनियुक्ती सोहळ्यात सर्वप्रथम दक्षिण पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र देऊन पदग्रहण सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी दक्षिण पश्चिम विभागातील अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी देखील राज साहेबांचे स्वागत केले. राज ठाकरे साहेबांचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा शुक्रवारी नागपुरात राजकारणाचा केंद्रबिंदू होता. विमानळावरून ढोल ताशाच्या गजरात सर्व कार्यकर्त्यांनी बाईक रॅली मिरवणूक काढण्यात आली. नियुक्ती पदग्रहण सोहळ्यात वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी 273 पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित केले. त्यावेळी शहराध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे, महेश जोशी, रजनीकांत जिचकार, दक्षिण पश्चिम विभागातील विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे, श्याम पुणे, घनश्याम निकाडे, राजू उंबरकर, सरचिटणीस हेमंत गडकरी, अविनाश जाधव आणि प्रवक्ते संदीपभाऊ देशपांडे तसेच आमदार राजू दादा पाटील महिला सरचिटणीस रिटाताई गुप्ता, या सर्वांची उपस्थिती होती. हिवाळी अधिवेशन काळामध्ये नागपूर शहरात दुसऱ्यांदा राज ठाकरे यांचं आगमन होतास मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांचं स्वागत करून मनसे पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात हजारोंच्या संख्येत पार पडला असून कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे जंगी स्वागत केले. राज ठाकरेंनी आपले विचार कार्यकर्त्यांसमोर मांडले. त्यानंतर विदर्भातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. (दि.34 डिसेंबर 2022)