नागपूर: दि.१९ फेब्रुवारी :- दक्षिण नागपूर येथे युवा मित्र मंडळ सरस्वतीनगर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने दक्षिण नागपुर येथे आज रविवारी सरस्वती नगर बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या मंदिर परिसरात सकाळी 9 ते 11 यादरम्यान ढोल पथका सह रॅली काढण्यात आली. त्यावेळी शेकडो शिव सैनिक रॅलीत सहभागी झाले होते. नवयुवक बहुउद्देशीय संस्थेतर्फे बँड चे आयोजन केले होते. ढोल ताशाच्या कार्यक्रमात शुभम बिंगेवार यांनी खूप मोलाचे सहकार्य केले व मित्र मंडळांनी सहभाग घेतला होता. हि रॅली विठ्ठल नगर, हनुमान मंदिर, जानकी नगर, उदयनगर, तपस्या शाळेपासून सरळ महाकाली नगर चौक, त्यानंतर न्यू अमर नगर, परत विठ्ठलनगर होऊन सरस्वती नगर च्या मंदिरात समाप्ती झाली व मंदीरात आरती वंदना करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला होता.(दि.19/2/2023)