नागपूर दिनांक.21 फेब्रुवारी 2023 मंगळवार :- विदर्भस्तरीय माळी समाज सभा दिनांक.25 फेब्रुवारी 2023 शनिवार रोजी. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व समाज बांधवांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर ६३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संस्थेच्या विशेष आमसभेत दिनांक 29/01/2023 ला नावात बदल करून "महात्मा फुले माळी समाज शिक्षण संस्था" नागपूर असे नाव धारण करण्यात आले आहे, आम्हाला असे लक्षात आले की, माळी समाज विदर्भात विखुरला आहे. त्यांच्यात क्षमता आहे परंतु त्यांना योग्य अशा मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी यासंस्थेने असे ठरविण्यात आले की, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व्यवसायिक व सामाजिक प्रगती करून समाजामध्ये बंधुभाव जागृत करून राजकीय क्षेत्रात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समाजक्रांती घडविण्यासाठी दिनांक. 25 फेब्रुवारी 2023 रोजी, शनिवार ला दुपारी 12.00 वाजता. विदर्भातील सर्व जिल्हा व तालुका पातळीवर माळी समाज बांधवांची सभा आयोजित केलेली आहे. या सभेला समाजाची प्रगती एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने आपण उपस्थित रहावे.असे आयोजकांच्या वतिने कळविण्यात आले
स्थळ:- महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह रेशीम बाग चौक. प्रा.अरुण पवार अध्यक्ष, महात्मा फुले माळी
समाज शिक्षण संस्था नागपूर( दि.21/2/2023)