नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट तर्फे एक दिवसीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

मैत्रेय एज्युकेशनल सोसायटी द्वारा संचालीत नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, सातनवरी, नागपूर तर्फे एक दिवसीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

नागपूर दि.२२ फेब्रुवारी 2023 :- मैत्रेय एज्युकेशनल सोसायटी द्वारा संचालीत नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, सातनवरी, नागपूर तर्फे एक दिवसीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन २५ फेब्रुवारी रोजी नागपुरात आणि विदर्भातील अनेक ग्रामीण परीक्षेत्रातिल विद्यार्थी बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य सुंदर व उज्वल करण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक रोजगार उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता हा एक दिवसीय उपक्रमाचे आयोजन केले आहे. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी शुक्रवारी सकाळी ९ वाजता पासून महाविद्यालयाच्या परिसरामध्ये भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामध्ये नामांकित 30 हुन अधिक नामांकित कंपन्या महाविद्यालयातील परिसरामध्ये प्रत्यक्षात येऊन सहभागी होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. तेव्हा बी.ई.एम.टेक. पॉलीटेक्निक, एम सि ए व बी सि ए पास, तसेच इतर पदवी प्राप्त विद्यार्थी, या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. या भव्य महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता प्रवेश निशुल्क असून दिलेल्या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक राहील. www.nietm.in या लिंक वर संपर्क साधू शकता. रोजगार मेळाव्या करिता बर्डी मेट्रो स्टेशन पासून नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, नागपूर पर्यंत बसची सुविधा सकाळी ९ वाजता पासून दर एक तासानंतर उपलब्ध राहील. नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, सातनवरी, नागपूर च्यावतीने पत्रपरिषद घेण्यात येणार असून त्यावेळी इंजिनिअर मदन माटे (अध्यक्ष, मैत्रेय एज्युकेशनल सोसायटी), डॉ. एस. एम. केलो (प्राचार्य), डॉ. एम. के. रहांगडाले (उपप्राचार्य), श्री. राहुल ब्राह्मणे (एनआयईटीएम, सल्लागार), डॉ. साजिद खान (कार्यक्रम संयोजक) असे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित राहणार आहेत. (दि.22 फेब्रुवारी 2023)