नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागार्जुना अभियांत्रिकीच्या महा रोजगार मेळाव्यात ६११ उमेदवारांची निवड

मेळाव्यात तीस बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यानीं सहभाग नोंदवला. त्यामध्ये नागपूर, अमरावती व विदर्भातील १२४५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या

नागपूर दि.२५ फेब्रुवारी :- ग्राम सातनवरी अमरावती रोड स्थित नागपूर येथील नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटनी आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यात तीस बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यानीं सहभाग नोंदवला. त्यामध्ये नागपूर, अमरावती व विदर्भातील १२४५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यातील ६१० उमेदवारांची निवड झाली. या मेळाव्याचे उद्घाटन महा मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक निखिल मेश्राम यांच्या हस्ते व कौशल्य विकासचे उपायुक्त प्रकाश देशमाने, अध्यक्ष इंजि. मदन माटे, सचिव अजय वाघमारे यांच्या उपस्थितीत झाले. निखिल मेश्राम यांनी आपल्या भाषणात, नजीकच्या काळात मेट्रोसह अनेक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच युवकांनी कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घेतले तरी आय टी क्षेत्रात भरपूर अनेक पदांवर नोकऱ्या मिळत आहेत. ह्या रोजगार मेळाव्यात उपस्थित उमेदवारांनी रील्स व सोशल मीडिया वर जास्त वेळ न घालवता अभ्यास पुर्ण गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष मदन माटेनीं विदर्भातील जास्तीत जास्त उमेदवारांची निवड करून राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याची विनंती उपस्थित कंपन्यांना केली. नागार्जुनाचे रोजगार मेळाव्याचे आयोजन एक स्तुत्य उपक्रम असून, आम्ही कौशल्य भारत अभियानात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. याप्रसंगी निमंत्रक प्राचार्य डॉ.संजय केलो यांनी प्रस्तावना केली व समन्वयक डॉ.साजिद खान यांनी आभार मानले. यावेळी मंचावर उपप्रचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले, एन आय टी एम सल्लागार राहुल ब्राम्हणे उपस्थित होते. संचलन प्रा. स्वाती सोनटक्के ह्यांनी केले. प्रा.बिना रेवतकर, प्रा.अतुल आकोटकर, डॉ.योगेश बैस, प्रा.कुशाल यादव, डॉ.जयकुमार अंबादे, डॉ.सूरज देशमुख, प्रा.वृषाली पराये, प्रा.दर्शना खडसे, प्रा.वैष्णवी ठमके, प्रा.प्रिया फरकाडे, प्रा.आश्विनी वालदे, प्रा.हर्षा मेश्राम, प्रा.रसिक उपाध्ये, प्रा.चार्ली फुलझेले,प्रा. संदीप ठाकरे, प्रा. आतिफ नवाब, शुभम इंगोले आणि प्रा.जयेश तांदुळकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. (दि.25/2/2023)