नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

श्री,साई बाबांच्या समाधी दिना निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम

. साई बाबांच्या समाधी दिना निमित्त आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचा शेकोडो भक्तांनी लाभ घेतला.

नागपूर ता १५ ऑक्टोबर २०२०,श्री.साईबाबा श्रद्धा सबुरी सेवा संस्थान नागपूर ( साईदूत परिवारांतर्फे) विद्यमाने आज गुरुवार दि.15 ऑक्टोबर 2020 रोजी, श्री. साई बाबांच्या समाधी दिना निमित्त आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचा शेकोडो भक्तांनी लाभ घेतला. वर्धा रोड साई मंदिराच्या बाहेर रोडवरील महाप्रसादाचा मोठ्या उत्साहाने साईभक्तांनी आनंद घेतला. त्यापुर्वी साईबाबा च्या प्रतिमेला पूजा आरती करून नंतर महाप्रसादाला सुरवात करण्यात आली. नागपुरातील साई भक्तांनी बाहेरूनच दर्शन करून पुरी, भाजी, आणि सोनपापडी अशा प्रकारे महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री.साईबाबा श्रद्धा सबुरी सेवा संस्थांचे सचिव साईदूत अनुप मुरतकर यांनी हि माहिती प्रसिद्धीपत्रकात दिली. तसेच उद्देशुन बोलले निस्वार्थ सेवा हेच आमचे कार्य.