नागपूर दिनांक 25 फेब्रुवारी 2023:- समाज एकत्रीत करण्यासाठी विदर्भातील माळी समाजाची महात्मा फुले शिक्षण संस्थेत विदर्भस्तरीय माळी समाज सभा संपन्न माळी समाजाला सत्तेत भागीदारी न मिळाल्यास प्रस्तापितांना धडा शिकविणार
आज शनिवार दि 25 फेब्रुवारी 2023 ला दुपारी 12.00 वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील माळी समाजातील मान्यवर, जेष्ठ नेते व समाज बांधव यांच्या उपस्थितीतसंस्थेच्या सभागृहात सभा संपन्न झाली.
प्रास्ताविक भाषणामध्ये माळी समाज सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक, व राजकीय दृष्ट्या मागासलेला असून विदर्भातील ग्रामीण क्षेत्रातील माळी समाज अत्यंत दयनीय परिस्थितीत जिवन जगत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये भागीदारी न मिळाल्यामुळे व लोकसंख्येचा प्रमाणात सत्तेत भागीदारी नसल्यामुळे समाजाला सर्व क्षेत्रात विकास करण्यासाठी लागणारे ध्येय धोरण बनवू शकला नाही. माळी समाजासोबत इतरही वंचित समाजाला राजकीय क्षेत्रात भागीदारी मिळाली नाहीतेव्हा ती मिळवून देण्यासाठी व घेण्यासाठी महात्मा फुले शिक्षण संस्था हि अग्रेसर राहील. विधानसभेचा निवडणुकीत माळी समाजाचा मतदार संघ निहाय लोकसंख्येचा प्रमाणात प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करावा यावर समाजातील सर्व नेत्यांमध्ये व सर्व समाज बांधवाशी चर्चा करण्यात आली. विदर्भातील 15% माळी समाजाला प्रस्थापित राजकीय पक्ष न्याय देण्यास तयार नसेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षाला धडा शिकविल्याशिवाय माळी समाजातील सर्व राजकीय पक्षातील लोकांनी एकमुखाने निर्णय घेतला आहे. आणि विदर्भातील संपूर्ण विधानसभेसाठी सर्व वंचित समाजाला सोबत घेऊन धोरनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. माळी समाज विदर्भात विखूरलेला आहे. विदर्भातील माळी समाजाचे मान्यवर व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. माजी आमदार बळीराम सिरस्कार, बाळापूर, अकोला, माजी आमदार अशोकराव मानकर, नागपूर, नानाभाऊ लोखंडे, नागपूर,माजी नगरसेवक सतीश होले, नागपूर आर.आर.सैनी, नागपूर, ओमप्रकाश कुशवाह, नागपूर, अरुणजी तिखे, चंद्रपूर, राजेंद्रजी आण्डे, ऍड.नितीन देशमुख, रमेश गिरडकर, कोराडी, सचिन गावंडे, तळेगाव,ऍड नंदेश अंबाडकर, अमरावती, अनिल ओंकार संजय डांगोरे, काटोल, प्रमोद गावंडे, अकोला, छगनदादा मेहत्रे, सिंदखेड राजा, मंगेश चिखले, अकोट, विजय अत्तरकार, पातूर, राजू डोंगरे, वरोरा, आनंद बोराडे, आकोट, सदाभाऊ विठ्ठले, सौंदड, मनोज बेले, कामठी, गुलाबराव नाल्हे, नागपूर घनश्याम खवले, नागपूर, हरिश्चंद्र टाकरखेडे, कळमेश्वर,श्री विलास सपाटे, वरोरा, प्रकाश डोंगरवार, गोंदिया, हरिभाऊ सावरकर, अकोला, राजेश काळपांडे, अकोला, सुनील क्षीरसागर, अकोला, डॉ ज्ञानेश्वर गोरे, यवतमाळ, डॉ पुष्पाताई तायडे, वर्धा, सौं रोहिणी पाटील, वर्धा,वासुदेवराव चौधरी, अमरावती, विलास वानखेडे, कारंजा, नंदू नागरिकर, चंद्रपूर, दीपक वाढई, मूल, डॉ राजेश गावतुरे, चंद्रपूर, राजाभाऊ हाडोळे, अमरावती, डॉ अभिलाषा गावतुरे, चंद्रपूर, दिलीप सोनुले, अड्याळ, डॉ राजेश नांदुरकर, पवनी, धर्मेंद्र नंदरधने, पवनी, अनिल किरणापुरे, साकोली, सदाभाऊ विठ्ठले, सौंदड, यशवंत उपरीकर, साकोली, कृष्णा उपरीकर, अर्जुनी मोरेगाव, आशिष निमकर, अमरावती राजेंद्र हाडोळे, अमरावती, श्याम सोनुले, ब्रम्हपुरी, प्रशांत घोळसे, सावनेर, रितेश बनकर, सावनेर, प्रवीण बेलसरे, सावनेर, नरेंद्र खारकर, आर्वी, अरुण भेदे, भंडारा, लीलाधर भोयर, लोणखैरी, डॉ शेषराव उमप, धनराज फरकाडे, राजू गाडगे, मीनल येवले, विनय डहाके, वर्धा व मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर, सहचिटणीस रमेश राऊत, कोषाधक्ष प्रा मुकेश घोळसे, संचालक सुनील चिमोटे, अजय गाडगे, कृष्णा महादुरे, शरद चांदोरे, राजेंद्र पाटील, मोहित श्रीखंडे, डॉ. प्रा.अभिजित पोतले, प्रकाश बोबडे, राजेंद्र वाघे, नंदू कण्हेर, संचालिका श्रीमती शोभा लेकुरवाळे, डॉ प्रा अलका झाडे, सौं माधुरी गणोरकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा पंकज कुरळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मधून देवेंद्र काटे यांनी संस्थेचे ध्येय व दृष्टीकोन ठेवला.(दिनांक 25 फेब्रुवारी 2023)