नागपुर,दिनांक 25 फेब्रुवारी :- नागपूर येथील.विद्यानगर प्रभाग २६ येथे वाठोडा ले आउट येथील गणपती मंदिरात कार्यसम्राट आमदार कृष्णाजी खोपडे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 25 फरवरी रोजी आयोजक सौ. समिताताई राजेंद्र चकोले सभापती नेहरूनगर झोन नगरसेविका यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम सकाळ पासून तर संध्याकाळ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरांचा लाभ घेतला असून अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितगण आमदार कृष्णाजी खोपडे, संजय अवचट अध्यक्ष, पूर्व नागपूर नगरसेवक धर्मपाल मेश्राम, राजू गोतमारे महामंत्री, पूर्व नागपूर जे पी शर्मा, महामंत्री सुनील सूर्यवंशी, संपर्क प्रमुख सुधीर दुबे, कार्याध्यक्ष वैभव शर्मा, अध्यक्ष उत्तर भारतीय आघाडी यांची प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवेंद्र कटोलकर, प्रशांत मानापुरे, प्रवीण बोबडे, मधु राऊत, प्रीतम देशमुख, चापले काकाजी, नंदाताई भोयर, कविताताई हत्तिमारे, छायाताई गुज्जेवर, कल्पनाताई सार्वे, सिंधुताई पराते, डॉलीताई सारस्वत , आलोक मानापुरे, चंदू वैद्य, व आयोजक सौ. समिताताई राजेंद्र चकोले सभापती नेहरूनगर झोन नगरसेविकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
(दि.25/2/2023)