नागपूर दिनांक, 5 मार्च 2023:- श्री संत गुलाबबाबा सेवा आश्रम सिरसपेठ येथे 22 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर, बीपी, शुगर, ईसीजी, दंत, स्त्रीरोग, एक्यूप्रेशर, बालरोग, रक्त तपासणी, नेत्र उपचार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४३२ जणांची तपासणी करण्यात आली तसेच पत्रकार बंधू व त्यांच्या कुटुंबीयांची देखील तपासणी करण्यात आली, संत गुलाबबाबा सेवा आश्रम सार्थक संस्थेचे डॉ. संजय लहाने परिवारयांच्या वतीने २३२ लोकांना मोफत औषधी, विठोबा पेस्ट, मोफत चष्मे वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना पॅन्टचे वाटप करण्यात आले. यात गरजू मुलांनी लाइफ लाईन हॉस्पिटल वाठोडा रिंगरोड, नागपूरचे डॉ. रवी रामटेके, सरस्वती लॅबचे डॉ.विनोद जैस्वाल, डॉ. प्रेम जोगी, डॉ.पल्लक अरिहिंत हॉस्पिटल, सार्थक संस्था धर्मार्थ दवाखाना नेत्रचिकित्सा अवंतिका वाडेकर, रितिका, डॉ. इंदिरा तुरनकर, डॉ. झांझाड, डॉ. फरकासे यांनी सेवा दिली, संत गुलाबबाबांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भक्तांना आणि शिबीरात आलेले नागरिकांना इडली सांभार याचा पोटभर नाश्ता देण्यात आला. यावेळी शिबीर कार्यक्रमात टिळक पत्रकार भवनचे देवराव प्रधान व त्यांच्या पत्नींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या शिबिरात शेखर आदमने, अविनाश नाईक, अजय वडाळकर, सावजी, डोंगरे जी, दत्तू रोकडे, माणिक कापसे, धनंजय रावताळ, हर्षद रायचा, सचिन सावरकर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. संजय लहाने आणि डॉ. तुरंनकर या सगळ्यांनी खूप परिश्रम घेतले (दि.6/2/2023)