नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

स्पर्श फाऊंडेशन व वाठोडा मित्र परिवार तर्फे शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी

राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवा नेते सलिलदादा देशमुख आणि शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करुन कार्यक्रमाची

नागपूर दिनांक.10 मार्च 2023 :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती १० मार्च २०२३ ला स्पर्श फाऊंडेशन व वाठोडा मित्र परीवार चे संयोजक रुपेश वामनजी बांगडे यांच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवा नेते सलिलदादा देशमुख आणि शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवकालिन क्रिडा प्रात्यक्षिके, किल्ल्याच्या प्रतिकृतीत विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीवर आकर्षक ध्वनिफितांवर रंगबिरंगी लाईट्स आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत गाण्यांनी संपुर्ण परीसर जय भवानी, जय शिवाजी च्या जय घोषात निनादले होते. रंगबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी देखील या प्रसंगी करण्यात आली. कार्यक्रमांनतर हजारोंच्या संख्येत उपस्थित जनसमुदायाने महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाला प्रामुख्याने शेखर सावरबांधे, जानबा मस्के, सुभाष घाटे, सुनिताताई येरणे, राजुजी खरे, अजय धोपटे, योगेश न्यायखोर, निरंजन दहीवले, दिनेश येवले, पो.नि.सुहासजी चौधरी, राहुल ढाले, नत्थुजी दारोटे, कपील नारनवरे, आदि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवीली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलेश वराडे, मंगेश क्षिरसागर, राकेश खोडे, नरेश मेंघरे, शुभम भोयर, शंकर बनारसे, हर्षल खडतकर, हर्ष भुरे, रोहीत चोपकर, प्रफुल दारोटे, ब्रम्हानंद मस्के, कमलेश जुगेले, प्रविण कातकडे, गोलु बांगडे, सुरेंद्र हिवरकर, प्रशांत ढाले, पवन गावंडे, नंदु थोटे, स्वप्नील घुमडे, राम घुमडे, गुरुदेव आंबोणे, प्रमोद तिरबुडे, विजय ठाकरे, चुन्नीलाल लांजेवार, वैभव येलेकर, नाना सुर्यवंशी, विनायक सुर्यवंशी सौ.बबीता बांगडे, सिंधुताई कामडे, मुक्ताताई दारोटे, सरोज वराडे, प्रनोती मानापुरे, मंजुषा चकोले, पदमा हिवरकर आणि शेकडो महिला व बाल गोपालांनी अथक परीश्रम घेतले. (दि.10 मार्च 2023)