नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

श्री संत गजानन महाराज विश्रांतीस्थळ व गोसेवालयाचा वास्तुपुजन शुभारंभ

श्री संत गजानन महाराज विश्रांतीस्थळ व गोसेवालयाचे वास्तुपुजन शुभारंभ कार्यक्रम 17 ते 19 मार्च या दरम्यान होत असून या

नागपूर दिनांक.15 मार्च :- श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकीतर्फे नारा आखरी बस स्टॉप नवीन जरीपटका येथे नवनिर्माण निर्मित श्री संत गजानन महाराज विश्रांतीस्थळ व गोसेवालयाचे वास्तुपुजन शुभारंभ कार्यक्रम 17 ते 19 मार्च या दरम्यान होत असून या कार्यक्रमात परमपूज्य संत श्री हरीहर महाराज सतधारा बरमान नरसिंहपुर मध्य प्रदेश तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती राहतील. या कार्यक्रमाला १७ मार्च सकाळी ७:३० ते ८:०० वाजे दरम्यान हरिपाठ, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पुण्याहवाचन, ध्वजारोहण, कलश स्थापना, गोशाळा, निवास संत तसेच अन्नपूर्णांचे वास्तुपुजन श्रींची आरती होईल. 18 मार्च रोजी सकाळी 7 ते 12 यादरम्यान गजानन विजय ग्रंथाचे महापरायण - यासोबत विजय ग्रंथ आणावा - नंतर सकाळी 11 वाजता. श्री दत्त महायज्ञ दुपारी 1 वा. आरती सायंकाळी 6 ते 7 यादरम्यान पुर्नाहुत्ती व महाआरती तसेच रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत हरिकीर्तन व प्रवचन संपन्न होईल. 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजता. परमपूज्य संतांद्वारे श्रींच्या अखंड धुनीची स्थापना सकाळी 9:30 ते 11:30 या दरम्यान गोपालकाल्यांच कीर्तन व महाआरती नंतर 11:30 ते 4:30 पर्यंत आरोग्य तपासणी शिबिर तसेच सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:३० पर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. या धार्मिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी लाभ घ्यावा. श्री संत गजानन महाराज सेवा समितीचे सचिव सनत गुप्ता सह सदस्यगण श्याम गडवे, हरीष शेगांवकर, रतन जाजू यावेळी मंचावर उपस्थित होते. (दि.15 मार्च 2023)