नागपूर, दि.19 मार्च 2023 :- उपराजधानीत 20 ते 21 मार्च दरम्यान सी-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सिव्हिल लाइन्स येथील पोलीस भवन येथे तयार करण्यात आलेल्या जी-20 अंतर्गत सी-20 वाटिकेचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, पोलीस आयुत अमितेशकुमार, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीसांनी पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने उचललेले पाऊल प्रसंशनिय असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.(दि.20 मार्च 2023)