नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले

नागपूर, दि १३ एप्रील 2023 : - राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, सचिव डॉ. सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे आदींनी स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचे स्वागत केले.( दि.13 एप्रील 2023)