नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

संघटनेच्या वतीने मुंबईत नारे निदर्शने 8 मे रोजी तर साखळी उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन ९ मे पासून

आदिम कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबईत नारे निदर्शने 8 मे रोजी तर साखळी उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन ९ मे पासून

नागपूर : दि. ०६ मे २० २३ :- महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 14 डिसेंबर 2022 चे अनुपालन न करणाऱ्या महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या वीज कंपन्या, एसटी महामंडळ, शासकीय, निमशासकीय कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी कार्यालयाच्या विरोधात प्रकाशगड / प्रकाशगंगा मुंबई येथील सोमवार दि. 8 मे 2023 ला दुपारी 12 वा. मुंबई येथे प्रकाशगड समोर ए.के.मार्ग बांद्रा मुंबई -51 व त्याच दिवशी दुपारी 2 वा. प्रकाशगंगा समोर फॅमिली कोर्टच्या मागे बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई 51- येथे > नारे निदर्शने आंदोलन करण्यात येईल. तसेच दुसऱ्या दिवशी मंगळवार ला ९ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून आझाद मैदान सीएसएमटी स्टेशन जवळ, आमरण/बेमुदत उपोषण व साखळी उपोषण/धरणे आंदोलन करण्यात येईल. वरील सर्व कार्यालया संदर्भातील कार्यालयातील अधिसंख्य कर्मचारी, अधिकारी, वरील आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन नागोराव पराते यांनी केले आहे. आदिम कर्मचारी संघटने च्यावतीने सरचिटणीस नागोराव पराते यांनी सांगितले(.दि.6/5/2023)