नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

बोधगयेत डॉ.आंबेडकर यात्री निवास निर्माण करा - भदन्त हर्षबोधी बोधगया

उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांनी शिष्टमंडळास आश्वस्त केले व बोधगयेत लवकरात लवकर जागा पाहण्याची सूचना शिष्टमंडळास केली

दिनांक 21 मे 2023 :- महाराष्ट्र शासनातर्फे बोधगया बिहार येथे बौद्ध जनतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्री निवास बांधण्यात यावे. या प्रमुख मागणीकरिता भदन्त हर्षबोधी यांचे नेतृत्वात शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांना देवगिरी येथे २१ मे २०२३ रोजी भेट घेतली. महाराष्ट्र शासनातर्फे अयोध्येत राम भक्तांसाठी यात्री निवास बांधण्याचा निर्णय नूकताच घेण्यात आल्यामुळे बौद्ध जनतेनेही आपली मागणी पूढे रेटली आहे. देवेन्द्र फडणविस यांनी शिष्टमंडळास आश्वस्त केले व बोधगयेत लवकरात लवकर जागा पाहण्याची सूचना शिष्टमंडळास केली. १९५६ पासून महाराष्ट्रातील बौद्धांसाठी बोधगया येथे निवासाची सोय नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्री निवास हक्कांचे बोधगयेत निर्माण व्हावे- महाराष्ट्रतील बौद्ध अभ्यांकांसाठी पाली विद्यापीठाचे निर्माण करण्यात यावे. पाटणकर चौक येथे कर्मवीर आवळे बाबू यांच्या स्मारकाचा अडलेला निधी लवकरात रिलिज करण्यात यावा. ईत्यादी मागण्यांवर उपमुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली भंदत हर्षबोधी यांनी बोधगया येथून आणलेली बुद्धमूर्ती मा.फडणवीसांना देवून चर्चा समाप्त झाली. शिष्टमंडळात, भदन्त हर्षबोधी डॉ.पूरणचंद मेश्राम निवृत्त विद्यापीठ अधिकारी भैयाजी खैरकर, विनायक जामगडे व पुरुसोत्तम गायकवाड यांची उपस्थिती होती. (दि.21 मे 2923)