नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

एमआयडीसी परिसरात विठु नामाचा गजर, पालखी सोहळा

आषाढी एकादशी निमित्त डिंगडोह येथील माऊली ग्रुप तर्फे एमआयडीसी परिसरात विठ्ठलाची पालखी शोभा यात्रा काढण्यत आली

नागपूर - हिंगणा दिनांक, 29 जुन 2023:- आषाढी एकादशी निमित्त डिंगडोह येथील माऊली ग्रुप तर्फे एमआयडीसी परिसरात विठ्ठलाची पालखी शोभा यात्रा काढण्यत आली . आज सकाळी १० वाजता साईं मंदिरातून या पालखी सोहळ्याची सुरवात झाली.एका वाहनावर विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती, त्यामागे पालखी , भजन मंडळ व हातात टाळ घेऊन भाविक पारधीनगर, रडके लेआउट, दुर्गानगर असे नगरभ्रमन करीत बालाजी नगरात समारोप करण्यात आला. परिसरातील शेकडो भाविक श्वेत वस्त्र धारण करून यात सहभागी झाले होते. हॅपी मॉर्निंग फ्रेंड्स ग्रुपतर्फे साई मंदिरात शाबुदाना खिचडी व हनुमान मंदिर परिसरात साईनगर मित्र मंडळ तफे प्रसाद वितरण करन्यात करन्यात आला. माऊली ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, सदस्य व माजी उपसभापती सुरेश काळबांडे ,डिंगडोह च्या सरपंच इंद्रायणी काळबांडे,माजी उपसरपंच किशोर पाटील, .ग्रामपंचायत सदश्य राजेश बोरकर, राकेश ऊमाळे,विष्णू बानाईत,सुरेश राजवाडे, बबन ठाकरे ,काशिनाथ मापारी,मोरेश्वर गायकवाड, सोपान तायडे, ललीतराव देशमुख , लक्ष्मण रडके ,बंटी भांगे ,बाळु दोडे ,अनंतकुमार नाकट,अभय राॅय,विजय सराड, सुनील बंड, राजेश नारखेडे,सगने यांच्यासह
दिपक सायखेडे ,सोनु तिवारी,अमित गाडे, राजेश कुंभलकर, नंदू कावरे,हेमंत ऊकंडे ,सोनु दुबे, प्रदीप बोरकर,अतुल कळसकर ,दया मिश्रा, सतीश काळे ,विठ्ठल वघाडे,जितु यादव ,दिनेश खेवले डॉ सचिन तायवाडे, गौरव भंडारकर ,प्रदिप बोरकर व गावकरी मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. (दि.29 जुन 2023)