नागपूर - हिंगणा दिंनांक. 12 जुलै 2023 हिंगणा मार्गावरील लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते इसासनी रस्त्याच्या बांधकामात होणारी अनियमितता दूर करून सरसकट हा रस्ता १३ मीटर रुंदीचा करण्यात यावा या मागणीसाठी आज या मार्गावर डिगडोह जागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. परिसरातील नागरिकांनी सुद्धा या आंदोलन स्थळी भेटी दिल्या.लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन पासून सीआरपीएफ कॅप-इसासनी हा रस्ता जेथे सामान्य जनतेचे अतिक्रमण होते ते काढून तेथे रस्ता १३ मीटर चा केला आणि जेथे धनाढ्य नेत्यांचे अतिक्रमण आहे तेथे रस्ता मोठ्यांचे अतिक्रमण न काढता लहान करून रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे.हा रस्ता नेहमी व्यस्त असतो या रस्त्याने लतामंगेशक हॉस्पिटल ला जाणारे रोगी, अंबुलन्स, रायसोनी, प्रियदर्शनी कॉलेज चे विधार्थी,इसासनी, श्रीकृष्ण नगरी, माधवनगरी येथील रहिवासी येणे जाणे करत असतात. बऱ्याचवेळा ह्या रस्त्यावर जाम लागून तासंतास वाहतूक खोळंबते.रस्ता लहान झाला तर परिस्थिती आणखी खराब होईल.म्हणून हा रस्ता सुरूवाती पासून शेवट पर्यंत १३ मिटरचाच बनवावा व लातमंगेशकर हॉस्पिटल मध्ये जाणाऱ्या अंबुलन्स लवकर हॉस्पिटलमध्ये पोहचाव्यात व त्यातील आजारी माणसाचा जीव वाचावा व परिसरातील नागरिकांचा ही त्रास कमी व्हावा, सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा ही मागणी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आली.डिगडोह जागृति मंचचे मंगेश लोखंडे, मोनु सिंग, ब्रिजेश मोर्या, जितेंद्र मेश्राम, गजानन व्यवहारे, अजय गुडधे, रवी कणेर, व्यंकटेश पांडलवार, सतीश कण्हेरकर, आनंद तायडे, अमर भांगे, रवी चतुर्वेदी, प्रशांत उज्वलकर, अभिजित दळवी, संदेश दुपारे, देवानंद वाघमारे, ईनेश श्रीवास्तव, अरुण सिंग, विक्रम इंगोले ,संजय कोल्हे, कमलेश ढबाले, दीपक निशाने, नवल सिंग, संदीप साबळे, अमोल भोयर, अजय तायडे, देवेंद्र डायरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.(दि.12 जुलै 2023)
उज्वलकर, अभिजित दळवी, संदेश दुपारे, देवानंद वाघमारे, ईनेश श्रीवास्तव, अरुण सिंग, विक्रम इंगोले ,संजय कोल्हे, कमलेश ढबाले, दीपक निशाने, नवल सिंग, संदीप साबळे, अमोल भोयर, अजय तायडे, देवेंद्र डायरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.(दि.12 जुलै 2023)