नागपूर दिनांक 15 जुलै 2023:- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्र व बाल रंगभूमी नागपूर शाखा तर्फे नाट्यगीत स्पर्धेचे कार्यक्रमाचे आयोजन
अभ्यासाबरोबरच विविध कला व क्रीडा क्षेत्रातही मोठ्या संधी असून याकडे करिअरच्या दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. शाळेतून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर कला व क्रीडा क्षेत्रांचे मार्गदर्शन व व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना या क्षेत्रातही करियर करता येऊ शकतो. विशेष म्हणजे गायन क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्याकरता पालकांनी सुद्धा पाल्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र नागपूर व बालरंग भूमी परिषद नागपूर शाखा यांच्या द्वारे आयोजित नाट्यगीत गायन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना महेश बंग यांनी केले.
व्यासपीठावर महेश बंग, डॉ अनिल इंदाणे, संजय रहाटे, रूपाली मोरे, दत्ता हरकरे, राम भाकरे, मंजिरी वैद्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र नागपूर व बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यामानाने बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाच ते बारा व तेरा ते अठरा अशा दोन वयोगटात नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन शंकर नगर नागपूर येथील राष्ट्रभाषा संकुल, बाबुरावजी धनवटे सभागृह येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हा केंद्राचे अध्यक्ष महेश बंग, बाल रंगाभूमी नागपूर शाखेच्या अध्यक्षा अभा मेघे,राजाभाऊ टाकसांडे,डॉ.कोमल ठाकरे, निलेश खांडेकर विलास कुबडे रोशन नंदवंशी, वैदेही चवरे, अमोल निर्बंते, किशोर बत्तासे, योगेश राऊत, अनिल देव,किशोर डाफ, अनिल कवडे आदींनी दीपप्रज्वलन करून केले. या स्पर्धेला विदर्भातील 40 पेक्षा जास्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एकापेक्षा एक अशी सरस नाट्यगीते सादर केली. स्पर्धेत अ गट ( 13 ते 18 वर्ष ) यात प्रथम पुरस्कार प्रियल डोनगावकर, द्वितीय पुरस्कार आयुष मानकर, तृतीय पुरस्कार दित्यश सिंग यांनी मिळवला तर गौरी सातपुते व स्वराली चापले यांना प्रोत्साहन पर पुरस्काराने गौरवण्यात आले. ब गट (पाच ते बारा वर्ष ) या गटात तोशिता मेहकर यांना प्रथम पुरस्कार, झुबी रायटर यांना द्वितीय तर आराध्य तायडे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. तरं सृष्टी रायटर, व गंधार देव यांना प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वनराईचे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी, बाळ कुलकर्णी,श्रीराम काळे आदी मान्यवरांनी प्रेक्षकांमध्ये बसून नाट्य गीतांचा आस्वाद घेतला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून दत्ता हरकरे, पत्रकार राम भाकरे, मंजिरी वैद्य यांनी जबाबदारी पार पडली.
सूत्रसंचालन वैदेही चवरे सोईतकर यांनी केले तरं स्पर्धेच्या आयोजनाकरिता व यशस्वी ते करिता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र नागपूर व बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (दि.15 जुलै 2023)
सूत्रसंचालन वैदेही चवरे सोईतकर यांनी केले तरं स्पर्धेच्या आयोजनाकरिता व यशस्वी ते करिता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र नागपूर व बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (दि.15 जुलै 2023