नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

हिंगण्यात रंगली देशभक्तीपर समूह गीतांची मैफिल

यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूर व संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणा यांच्यावतीने आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत

नागपूर/ हिंगणा, दिनांक 8 ऑगष्ट 2023:- तिरंगा आन भारत की तिरंगा शान भारत की.... गाणे स्वातंत्र्याचे नव्या युगाचे.. निर्माण के पावन युग मे हम चरित्र निर्माण को ना भुले,स्वार्थ साधना के आधी मे वसुंधरा का कल्याण हम ना भुले... भारत भूमी प्यारी वीर जवानों की माता दुल्हारी... अशा देशभक्तीपर समूहगीतांची मैफिल हिंगणा येथे यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूर व संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणा यांच्यावतीने आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत रंगली . स्पर्धेचे उद्घाटन नागपूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते व या स्पर्धेचे संयोजक दिनेश बंग, यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूरचे अध्यक्ष महेश बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव अव्हाळे, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे, संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेच्या संचालिका अरुणा बंग, यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर केंद्राचे कोषाध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. स्पर्धेत हिंगणा तालुक्यातील 33 शाळांनी सहभाग नोंदविला. वर्ग पाच ते सात यातील विद्यार्थी अ गटात तर वर्ग आठ ते दहा या वर्गातील विद्यार्थी ब गटात अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक सरस समूह गीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. स्पर्धेनंतर लगेच निकाल घोषित करण्यात आला व स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली त्यात अ गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडोंगरी प्रथम पुरस्कार, इसेन्स इंटरनॅशनल स्कूल वडधामना, द्वितीय पुरस्कार, स्वर्गीय देवकी बाई बंग इंग्रजी माध्यमिक विद्यालय हिंगणा तृतीय पुरस्कार तर शांग्रीला हायस्कूल वानाडोंगरी व सोमवार विद्यालय वडधामना यांना प्रोत्साहन पर पुरस्कार देण्यात आले. ब गटात प्रथम पुरस्कार इसेन्स इंटरनॅशनल स्कूल वडधामना यांना द्वितीय स्थान स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडोंगरी यांनी मिळवलं,तृतीय स्थान बालाजी हायस्कूल बालाजी नगर हिंगणा यांना मिळाले तर या गटात जिल्हा परिषद हायस्कूल हिंगणा, व श्रीकृष्ण हायस्कूल सावंगी असोला यांना प्रोत्साहन पर पुरस्कार देण्यात आले. विजेत्या गीत समूहांना यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूरचे अध्यक्ष महेश बंग, बालगंधर्व रंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष संजय रहाटे, उपाध्यक्षा रूपाली मोरे, संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेच्या संचालिका अरुणा बंग, रवींद्र देशमुख,अनिल इंदाणे मंजुषा सावरकर, वर्षा गुजर यांच्या हस्ते देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून गायक सारंग जोशी, गायिका श्रेया टाकसाळे यांनी काम सांभाळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद महल्ले यांनी तर आभार अनिल इंदाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर केंद्राचे पदाधिकारी व श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. (दि.8 ऑगष्ट 2023)
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर केंद्राचे पदाधिकारी व श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. (दि.8 ऑगष्ट 2023)