नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

येणारे युग संस्कृतचे असेल - मा. राज्यपाल श्री. रमेश बैस

संस्कृत विश्वविद्यालयाने आयआयटी, एम्स तसेच अन्य विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्थांबरोबर कार्य करावे - मा. राज्यपाल श्री रमेश बैस

रामटेक दिनांक .17 सप्टेंबर 2023:- येणारे युग संस्कृतचे असेल - मा. राज्यपाल श्री. रमेश बैस संस्कृत विश्वविद्यालयाने आयआयटी, एम्स तसेच अन्य विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्थांबरोबर कार्य करावे - मा. राज्यपाल श्री रमेश बैस संस्कृताधारित संशोधनपर कार्यामुळे वैज्ञानिक भाषिक क्षमता , प्रकाशित होतील - मा. राज्यपाल महोदय , कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या, संशोधकछात्र-भवनाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथील संशोधक छात्रा भवन आणि मा. कुलगुरू निवासभवनाचा लोकार्पण समारोह आणि संस्कृतमधील पाठचिकित्सा Textual Criticism in Sanskrit या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन समारोह रविवार, दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता रामटेक येथे संपन्न झाला. या लोकार्पण समारोहाचे अध्यक्षस्थान सन्माननीय राज्यपाल श्री रमेश बैस यांनी आभासी माध्यमातून उपस्थित राहून भूषविले. श्री लालबहादूर शास्त्राी राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रो. मुरलीमनोहर पाठक मुख्य अतिथी या नात्याने तर कविकुलगुरू कालिदास संस्कृृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू डाॅ. पंकज चांदे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते. समारोहाचे यजमान विश्वविद्यालयाचे मा. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी, कुलसचिव डाॅ. रामचंद्र जोशी, परिषदेच्या समन्वयिका प्रो. कविता होले विशेषत्वाने व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विश्वविद्यालय गीताने झाला. मा. कुलगुरू महोदयांच्या वतीने रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डाॅ. दिनकर मराठे यांनी मा. राज्यपाल महोदयांचा शाल, कालिदास वाङ्मय संच व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. प्रारंभी मा. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी स्वागतपर भाषण केेले. मा. कुलगुरूमहोदयांनी स्वागतपर भाषणात आगामी पाच वर्षातील करणीय योजनांचा आढावा सादर केला. भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित अभ्यासक्रम संस्कृत विद्यापीठ तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ए प्लस प्लस ही नॅक ची श्रेणी प्राप्त करणे, वारंगा परिसर विकास तथा महाराष्ट्रात उपकेंद्रांची स्थापना हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.उद्घाटन त्रिवेणी - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या संशोधकछात्र भवन आणि मा. कुलगुरू निवास भवनाचे लोकार्पण महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती मा. श्री. रमेश बैस यांच्या शुभहस्ते आभासी माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. जनसंपर्क अधिकारी डाॅ. रेणुका बोकारे संपादित विश्वविद्यालयाचे त्रैमासिक वैदर्भी च्या 22 व्या अंकाचे प्रकाशनही याप्रसंगी करण्यात आले. या उद्घाटनाबरोबरच विश्वविद्यालयाच्या आऊटरिच प्रोग्राम अंतर्गत मा. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी महोदयांच्या शुभहस्ते रामटेकमधील दोन गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भारत सरकारच्या मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत सर्व मान्यवरांनी कलशात स्वहस्ते मातीस्थापना केली आणि मा. राज्यपाल महोदयांसह सर्वच उपस्थितांनी पंचप्राण शपथ ग्रहण केली. मुख्य अतिथी श्रीलालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. मुरलीमनोहर पाठक यांनी विश्वविद्यालयाच्या आगामी काळातील विकासासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष अतिथी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू डाॅ. पंकज चांदे यांनी विश्वविद्यालयाचा विकासवेग बघता आगामी काळात संस्कृत विश्वविद्यालय हे आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र म्हणून मध्यभारतात नावारूपाला येईल असा आशीर्वाद दिला. मा राज्यपाल महोदय भाषण मा. राज्यपाल श्री रमेश बैस आपल्या भाषणात म्हणाले, संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात संस्कृत व मातृभाषा या दोहोंना महत्त्व देण्यात आले आहे. संस्कृत विश्वविद्यालयाने आयआयटी, एम्स तसेच अन्य विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्थांबरोबर कार्य केले पाहिजे. या एकत्रित शैक्षणिक व संशोधनपर कार्यामुळे संस्कृत भाषेतील ज्ञानासह तिच्या अन्य वैज्ञानिक भाषिक क्षमतांचा वापर होवून त्या जगासमोर प्रकाशित होतील. संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांची बोली भाषा म्हणून प्रचार व प्रसारात येणे हे महत्त्वाचे आहे. मला विश्वास आहे, की येणारे युग हे संस्कृतचे असेल या दृष्टीने कालिदास संस्कृत विश्वविद्यालय बहुविध प्रकारे कार्य करीत असल्याचे दिसून येते. विश्वविद्यालये ही समाजाचे देशाचे अभिन्न अंग आहे, समाजात मिसळून त्यांनी कार्य करायला हवे, या दिशेने आऊटरिच कार्यक्रमांतर्गत संस्कृत विद्यापीठ रामटेकमधील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी कार्य करीत आहे यासाठी मी विश्वविद्यालयाचे अभिनंदन करतो. देशभरातील संशोधक छात्रांसाठी छात्राभवन उभारणे समुचित आहे. त्याचा लाभ विद्यार्थी, घेतील. पाठचिकित्सेसारख्सा महत्त्वाच्या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी मा. कुलगुरू प्रो. त्रिपाठी, समन्वयक प्रो. कविता होले आणि प्रो. पराग जोशी यांचे अभिनंदन करतो. कार्यक्रमाचे संचालन साहित्य विभागातील प्रोफेसर पराग जोशी यांनी केले तर आभार कुलसचिव डाॅ. रामचंद्र जोशी यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संशोधकछात्र भवन आणि मा. कुलगुरू निवास चे लोकार्पण मा. राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते संपन्न, मूळ अतिथीगृह इमारतीवरील पहिला व दुसरा मजल्याच्या बांधकामाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे वित्तीय अनुदान प्राप्त झाले आहे. एकूण 1085 स्क्वे. फू. क्षेत्राफळाच्या या इमारतीत दोन मजले मिळून एकूण 30 खोल्या बांधण्यात आल्या असून जवळपास 100 संशोधक छात्रा येथे राहून संशोधन करून शकतात. या इमारतीत मा. कुलगुरू महोदयांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. विश्वविद्यालयाचे उपअभियंता श्री. संतोष वाडीकर यांचे या भवननिर्मितीत योगदान आहे. One Day National Seminar on Textual Criticism in Sanskrit या लोकार्पण कार्यक्रमासह संस्कृतमधील पाठचिकित्सा, Textual Criticism in Sanskrit
या लोकार्पण कार्यक्रमासह संस्कृतमधील पाठचिकित्सा, Textual Criticism in Sanskrit या संशोधकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजनही आज करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटनही मा. राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते करण्यात आले. या चर्चासत्रासाठी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्याद्वारे आर्थिक अनुदान प्राप्त झाले आहे. या चर्चासत्राच्या समन्वयक संस्कृत भाषा व साहित्य विभागाध्यक्षा प्रो. कविता होले आणि साहित्य विभागातील प्रोफेसर पराग जोशी आहेत. या चर्चासत्रात श्री लालबहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. मुरली मनोहर पाठक यांचे बीजभाषण झाले.(दि.17/9/2023)