नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

रॅम्प कॅम्युनिकेशन ने मारली बाजी

खेळाडूंच्या १२ संघानी भाग घेतला असून अंतिम सामना गोरा - ११ विरुद्ध रॅम्प कॅम्युनिकेशन या संघात रविवारी मानकापूर स्टेडियमच्या प्रांगणात खेळण्यात आला

नागपूर : (दि. २४ नोव्होंबर २०२०) आठ महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर खेळांडूमध्ये उत्साह व स्फूर्ती निर्माण करण्याच्या हेतूने अनिल कोटांगले यांनी कोरोना नियमावलीचे पालन करीत कपिल पिमीयर टी - २० क्रिकेट सामन्याचे आयोजन नुकतेच मानकापूर व तायवाडे स्टेडियमच्या प्रांगणत केले होते, या सामन्यात १६ ते १९ वयोगटातील खेळाडूंच्या १२ संघानी भाग घेतला असून अंतिम सामना गोरा - ११ विरुद्ध रॅम्प कॅम्युनिकेशन या संघात रविवारी मानकापूर स्टेडियमच्या प्रांगणात खेळण्यात आला . यात गोरा ११ संघाला रॅम्प कॅम्युनिकेशन संघानी ९ विकेटनी मांगे टाकीत विजय मिळविला. विजेत्या संघाला मॅन ऑफ दि मॅच फाइनल, मॅन ऑफ दि सिरीज, बेस्ट बॉलर आकाश गौतिक यांना देण्यात आला. तर बेस्ट बॅट्मॅन सुगत लाडे यांना देण्यात आला. या सामन्याच्या समापन कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नागपूर शहराचे पोलिस उपायुक्त विवेक मसाळ, आंतरराट्रीय दिव्यांग क्रिकेट पटू गुरूदास राऊत, नागपूर महानगर पालिकेचे प्रवर्तन निरिक्षक संजय कांबळे, सि. ए. रोशन होरे, पुरूषोत्तम पिसे, उत्तम मिश्रा, विठोबा कोटांगले, विजय पाटील, धनंजय उपासनी, संजय करवाडे, सचिन ठोंबरे, अशोक काटेकर, विनय यादव, जनक शाहू, अंजेश तिवारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्य स्तरीय चॅम्पीयन नागपूर दिव्यांग संघाच्या खेळांडूना सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यात महिला दिव्यांग खेळांडू मंगला अडमकर , भारतीय दिव्यांग महिला खेळांडूचा समावेश होता , रॅम्प कॅम्युनिकेशन ने मारली बाजी ( दि 24/11/2020)