नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला सहायक विधी सहाय्य बचाव अधिवक्ता, सर्वत्र कौतुकाची थाप

सामान्य गरीब कुटुंबातील मुलाने यशाचे शिखर गाठले आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी आदर्श निर्माण केला

नागपूर,दि.11 :- जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणतेही यश मिळवू शकतो. याच त्रिसूत्रीच्या जोरावर रामटेक तालुक्यातील लोधा गावातील एका सामान्य गरीब कुटुंबातील मुलाने यशाचे शिखर गाठले आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी आदर्श निर्माण केला आहे. लोधा गावातील योगेश नीलकंठ चेके हा एक गरीब शेतकरी कुटुंबातील मुलागा. त्याची गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे सहायक विधी सहाय्य बचाव अधिवक्ता पदी निवड झाली. त्याचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतही गुणवत्ता ठासून भरली असून त्यांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास ते कोणत्याही क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवू शकतात हे दाखवून देणारे आहे. नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील लोधा या गावातील योगेश नीलकंठ चेके याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. नागपूर येथील नागसेन विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर ११ वी - १२ वीचे शिक्षण त्याने वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था येथून घेतले. त्यानंतर त्यांनी आंबेडकर कॉलेज मध्ये कला क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय(मुख्य शाखा) नागपूर येथे एलएलबी चे उच्चशिक्षण घेतले. आपल्या यशबद्दल बोलताना योगेश चेके म्हणाला, आई वडिलांची हलाखीची परिस्थिती हीच माझी प्रेरणा आहे. प्रवासात माझे मोठे बंधू हितेश चेके व मजले बंधू निलेश चेके आणि
सोबतच वरिष्ठांबरोबर मित्र परिवाराचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे सांगायलाही तो विसरला नाही. योगेश च्या दिवस रात्र एक करून मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. योगेश चे यश ग्रामीण भागातील मुलांसाठी प्रेरणादायी आहे.