नागपूर, दि. 17 ऑक्टोंबर 2023 : - दिघोरी चौकात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला आज प्रारंभ झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली.
आमदार सर्वश्री मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके यांच्यासह देशातील विविध भागातून आलेले नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमरेड मार्गावरील दिघोरी चौक येथील बहादुरा फाटा टोल नाक्याजवळ असलेल्या 80 एकर परिसरात या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन ते अडीच लाख लोक बसतील असा सभामंडप तयार करण्यात आला आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत हे आयोजन करण्यात आले आहे.
येथील बहादुरा फाटा टोल नाक्याजवळ असलेल्या 80 एकर परिसरात या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन ते अडीच लाख लोक बसतील असा सभामंडप तयार करण्यात आला आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत हे आयोजन करण्यात आले आहे.