नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

गदिमांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपूर येथे काव्यजागर कार्यक्रम संपन्न

गदिमा जन काव्य जागर , हा कार्यक्रम हाती घेऊन संपूर्ण भारतभर १४ डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यासाठी नागपूर येथे सुध्दा या कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर दि 14 डिसेंबर , गदिमांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदित्य हॉटेल धरमपेठ नागपूर येथील सभागृहात, गदिमा काव्यजागर कार्यक्रम संपन्न.. नागपूरःगदिमांना जाऊन ४३ वर्ष पूर्ण होऊनही या साहित्य सम्राटाचे म्हणजेच आधुनिक वाल्मिकी चे कुठेच स्मारक नाही .ते स्मारक पुण्यात व्हावे यासाठी शासन दरबारी ४३ वर्षापासून सतत रेटा धरूनही शासनाने आणि आजपर्यंत सत्तेत आलेल्या राज्य कर्त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून गदिमांच्या चाहत्यांनी सबंध भारतातूनच नव्हे ,तर परदेशात राहणाऱ्या चाहत्यांकडून सुद्धा स्मारकासाठी " गदिमा जन काव्य जागर , हा कार्यक्रम हाती घेऊन संपूर्ण भारतभर १४ डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यासाठी नागपूर येथे सुध्दा या कार्यक्रमाचे आयोजन अविनाश पाठक यांचे अध्यक्षतेखाली तसेच मा. गोपाल कडूकर. आणि श्रीकृष्ण चांडक यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी गदिमांना आदरांजली व्यक्त करतांना अविनाश पाठक म्हणाले की, गेली ४३ वर्षे गदिमांच्या स्मारकासाठी लढा सुरू असून या आधुनिक वाल्मिकी चे कुठेच स्मारक नाही. ते पुण्यात होण्याच्या दृष्टीने शासनाने पुढाकार घेऊन हे कार्य पूर्णत्वास न्यावे यासाठी त्यांच्या स्मृतिदिनी आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचे खरे प्रयोजन आहे.तसेच गदिमांच्या संपूर्ण साहित्यावर आणि कारकिर्दीवर मा. गोपाल कडूकर यांनी थोडक्यात प्रकाश टाकला. या काव्यजागर कार्यक्रमात सुनील वाडे, प्रा.संजय तिजारे, योगेश वासाड , सौ.विजया धोटे, श्री.हभप मुकुंदबुआ घारपुरे , स्वाती सुरंगळीकर,सौ मधुरा देशपांडे, श्रीकृष्ण चांडक, डॉ. देवामन कामडी, राजू डहाके, पंकज जिचकार, कमलेश काटोलकर, वामन सोनटक्के, तन्मय लोही गुंजन धोटे, प्रभुदास रामटेके, विष्णू गोटाफोडे, डॉ. वसंत शिरभाते ई. कवींनी गदिमांच्या कविता सादर केल्या. या काव्यजागर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील वाडे, सूत्रसंचालन प्रा.संजय तिजारे यांनी केले तर अविनाश पाठक यांनी आभार व्यक्त केले. (दि 15/12/2020)