नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

बाल हक्कांच्या कायद्यांची अंमबजावणी करताना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील - ॲड. सुशिबेन शाह

बालहक्क संरक्षण आयोगाने पॉक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा नागपूर विभागातील

नागपूर दि. 6: - बाल हक्कांच्या कायद्यांची अंमबजावणी करताना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील - ॲड. सुशिबेन शाह बालहक्क संरक्षण आयोगाने पॉक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर शहर व ग्रामीण, वर्धा गडचिरोली, गोंदिया या जिल्यांच्या आढावा घेण्यासाठी नागपूर येथे आढावा बैठकीचे आयोजन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिबेन शाह यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले. सदर बैठकीत बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण, ॲड. जयश्री पालवे, सायली पालखेडकर, चैतन्य पुरंदरे, बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, जिल्हा महिला व बाल संरक्षण विभाग अधिकारी उपस्थित होते. बैठकीची सुरुवात दीपप्रज्वलन व महाराष्ट्र गीताने झाली. बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲड. श्रीमती सुशिबेन शाह यांनी प्रास्ताविक भाषण करत सर्व उपस्थितांचे स्वागत केले व बैठकीच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी अंजली निंबाळकर यांचे कौतुक केले. पोलीस विभाग आणि बालकल्याण समिती यांच्याकडून पोक्सो बाल न्याय अधिनियम संदर्भात प्राप्त माहितीचे विश्लेषण ॲड. संजय सेंगर व मजलिस संस्थेच्या मल्लिका वर्मा यांनी केले. तसेच नागपूर विभागाच्या प्रलंबित प्रकरणांची सुनावणी आयोजित करण्यात आली. यावेळी २५ प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. पाॅक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील तसेच येत्या काळात सर्वांना योग्य ट्रेनिंग देऊन बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल असे आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांनी सांगितले.
अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील तसेच येत्या काळात सर्वांना योग्य ट्रेनिंग देऊन बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल असे आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांनी सांगितले.