नागपूर 19मे 2025 :- नारा रोडवरील एचपी गॅस गोदाम च्यासमोर वेदनगर येथे पॉल स्नेहाश्रय ट्रस्ट च्यावतीने वृद्धाआश्रम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व गोर गरीब, अनाथ आणि बेघर असलेल्या नागरिकांची सेवा केली जाते. गरजूं, बेघर असलेले लोकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच जे श्रीमंत लोक आहे. त्यांच्या आई-वडिलांची सेवा करायची असेल तर या स्नेहाश्रय ट्रस्ट मध्ये संपर्क साधावा त्यांची पण सेवा केल्या जाईल. शहरातील प्रतिष्ठित, दानशूर, लोकांनी या वृद्धाश्रमाला तन-मन-धनाने मदत करावी. ही मदत आई वडिलांच्या सेवा करणाऱ्यांची ईच्छा तसेच आप्तेष्टांचे वाढदिवस अन्य कार्यक्रमाला होणारा खर्च या वृद्धाश्रमास देऊ इच्छिणाऱ्यांनी
संचालकाशी संपर्क साधावा. असे आवाहन मेरी वर्गिस यांनी केले आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुनील वानखेडे यांनी ही माहिती दिली. अधिक माहितीसाठी मेरी वर्गिस यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा -9887731775