नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

कमलेशसिंह ठाकूर यांची आयुष्यमान भारत योजनेवर सहसंयोजक पदी निवड

कमलेशसिंह ठाकूर यांची आयुष्यमान भारत योजनेवर "सहसंयोजक पदी निवड ,महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत आयुष्यमान भारत योजना महाराष्ट्र प्रदेशचे सह सयोजक तसेच सरचिटणीस यांनी कमलेश सिंह ठाकूर यांची नुकतीच निवड केली असून

नागपूर दिनांक 22 जनवरी 2021 कमलेशसिंह ठाकूर यांची आयुष्यमान भारत योजनेवर "सहसंयोजक पदी निवड ,महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत आयुष्यमान भारत योजना महाराष्ट्र प्रदेशचे सह सयोजक तसेच सरचिटणीस यांनी कमलेश सिंह ठाकूर यांची नुकतीच निवड केली असून सतीश तालेवार, रिता निलेशसिंह यांच्या हस्ते सहसंयोजक या पदावर नियुक्त करण्यात आले. त्याप्रसंगी सचिव कीर्ती सोनी व उपाध्यक्ष बिजेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मागील १८ वर्षापासून सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मा. चंद्रकांतदादा पाटील प्रदेश अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश तसेच भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेशाचे प्रभारी गिरीश महाजन व डॉ.अजित गोपछडे यांनी नागपूरचे समाजसेवक कमलेशसिंह ठाकूर यांची सहसंयोजक पदी नियुक्तीचे पत्र सादर करून त्यांना सन्मानित केले. आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात अविरतपणे कार्य केले. गव्हर्मेंट च्या डाटानुसार कमलेश यांनी चाळीस ते पन्नास हजार गरजू, गरिब लोकांना मदत केली असेही यावेळी नमूद केले. या सेवेच्या माध्यमातून गोरगरिबांना, रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांच्याशी असलेला त्यांचा प्रेमळपणा व सेवाप्रतीभाव लक्षात घेऊनच भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे पक्ष संघटन वाढविण्याची व प्रामाणिकपणे प्रयत्न निश्चितपणे करण्यात यावा यासाठी त्यांची निवड केली आहे. कमलेश सिंह ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीचे तसेच वैद्यकीय आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश संयोजकांचे व सर्वांचे आभार मानले. (दि,22 जानेवारी 2021)