नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

महापौर, उपमहापौर व सत्ता पक्षनेत्यांनी स्वीकारला पदभार

नवनिर्वाचित महापौर श्रीमती नीता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीलाताई हाथीबेड व नागपूर महानगरपालिका सभागृहातील सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी आज

नागपूर, ता०९: नवनिर्वाचित महापौर श्रीमती नीता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीलाताई हाथीबेड व नागपूर महानगरपालिका सभागृहातील सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी आज नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या दिमाखदार कार्यक्रमानंतर पदभार स्वीकारला. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. मोहन मते, माजी महापौर व भाजपचे शहर अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी, माजी खासदार श्री. अजय संचेती, राज्य सफाई कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश डागोर, माजी आमदार श्री. अनिल सोले, माजी आमदार श्री. विकास कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., भाजपचे नेते श्री. संजय भेंडे, श्री. बंटी कुकडे, श्री. जयप्रकाश गुप्ता, श्री. राजेश बागडी, श्री. विक्की कुकरेजा उपस्थित होते. यावेळी माजी महापौर श्रीमती अर्चना डेहनकर, माजी महापौर श्रीमती मायाताई इवनाते माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. पिंटू झलके यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांनी मतदारांप्रती निष्ठावान राहण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या यशस्वी नेतृत्वात नागपूर शहर विकासाचे एक एक टप्पा पुढे टाकत आहे. या शहराला 2047 मध्ये विकसित नागपूर करण्याचा संकल्प या निमित्ताने सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व नगरसेवकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी महापौरपदाच्या या नव्या संधी सोबत जनतेच्या विकासाची जबाबदारी असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात शहराला विकासाचे नवे आयाम देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी पदाधिकारी व प्रशासनासोबत समन्वयाने काम करून शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले. प्रारंभी नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुत्त श्रीमती वसुमना पंत यांनी महापौर श्रीमती नीता ठाकरे यांचे तर उपमहापौर श्रीमती लीलाताई हाथीबेड यांचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांचे स्वागत उपायुक्त श्री. निर्भय जैन यांनी केले. यावेळी आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. मोहन मते व माजी खासदार श्री. अजय संचेती यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले तर आभार नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे यांनी मानले. नागपूर महानगरपालिकेतील नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये स्वागत समारंभानंतर महापौर श्रीमती नीता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीलाताई हाथीबेड, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी आपल्या आपल्या कक्षात जाऊन विधिवत पदग्रहण केले. यावेळी पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, माजी
महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. महापौर, उपमहापौर तथा सत्तापक्ष नेता यांच्या समर्थकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच ढोल वाजवून आनंद व्यक्त केला.