नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागपूर महानगरपालिकेचे - विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी स्वीकारला पदभार

नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून श्री. संजय महाकाळकर यांनी सोमवारी (ता.०९) पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे आमदार व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विकास ठाकरे, आमदार श्री.अभिजीत वंजारी...

मनपाचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी स्वीकारला पदभार नागपूर, ता.०९: नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून श्री. संजय महाकाळकर यांनी सोमवारी (ता.०९) पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे आमदार व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. अभिजीत वंजारी, शिवसेना (उबाठा) गटनेते श्री. किशोर कुमेरीया यांच्यासह काँग्रेसचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी श्री. संजय महाकाळकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी आज नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला. आमदार श्री. विकास ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे नेते श्री. किशोर कुमेरीया यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. महाकाळकर यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे आमदार श्री. अभिजीत वंजारी, नगरसेविका श्रीमती सुजाता कोंबाडे, नगरसेविका श्रीमती सलामे,श्री.प्रमोद ठाकूर, श्री. अभिजीत झा, योगेश तिवारी, काँग्रेसचे नेते श्री. उमाकांत अग्निहोत्री, श्री. संजय दुबे, श्री. गिरीश पांडव, श्री. अतुल कोटेचा, श्री. विशाल मुत्तेमवार, श्री. आकाश तायवाडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
श्री. अतुल कोटेचा, श्री. विशाल मुत्तेमवार, श्री. आकाश तायवाडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.