नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

रमाबाई बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी

रमाबाई बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली

नागपूर - रमाबाई बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी (गजानन ढाकुलकर ) हिंगणा : वानाडोंगरी येथील अष्टविनायक नगर, यशोदा लॉन येथे महिला मंडळाच्या वतीने रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. रमाबाई आंबेडकर यांच्या त्याग, सहनशीलता आणि सामाजिक परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान महिलांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनी दिलेले बळ आणि समाज उन्नतीसाठी केलेल्या कार्यावर विचार मांडले. महिलांनी एकत्र येऊन समाजात समानता, शिक्षण आणि आत्मसन्मानाचा संदेश देत रमाबाई आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाला श्वेता रामटेके, सपना साखरे, नुपूर साखरे, लाभा उके, कुसुम रामटेके, विहा उके, भारती डांगे, ज्योती गोंडाने, संगीता श्रीरामे, आम्रपाली सुखदेवे, भारती भगत, वर्षा तेलंग, निरवता गडपायले, सुनीता इंगळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिसरात सामाजिक ऐक्य, महिला सशक्तीकरण आणि प्रेरणादायी विचारांचे वातावरण निर्माण झाले होते.
निरवता गडपायले, सुनीता इंगळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिसरात सामाजिक ऐक्य, महिला सशक्तीकरण आणि प्रेरणादायी विचारांचे वातावरण निर्माण झाले होते.