नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

अनुदानीत व खाजगी शाळांची आढावा मार्गदशनाचे आयोजन

डिग्डोह नगरपरिषद येथे शिक्षण सभापती महेश लोखंडे यांच्या नेतृत्वात अनुदानित व विना अनुदानित खाजगी शाळांच्या प्रतिनिधींसोबत आढावा व मार्गदर्शन चे आयोजन

नागपूर,दिनांक १० जुलै २०२६ रोजी डिग्डोह नगरपरिषद येथे शिक्षण सभापती महेश लोखंडे यांच्या नेतृत्वात अनुदानित व विनाअनुदानित खाजगी शाळांच्या प्रतिनिधींसोबत आढावा व मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस विस्तार अधिकारी लीलाधर चरपे सर , मुख्याधिकारी रामेश्वर पंडागडे सर, नगराध्यक्षा पूजाताई उके तसेच डिग्डोह शहर हद्दीतील शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षण,सुरक्षा व स्वच्छता या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळांच्या प्रतिनिधींना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले, तसेच शैक्षणिक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या. यावेळी शाळांना भेडसावणाऱ्या अडचणी व समस्याही जाणून घेण्यात आल्या आणि त्या
सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण सभापती महेश लोखंडे यांनी केले. यावेळी,नगरसेवक रविरंजन सिंह उपस्थित होते