नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

दहा वर्षांचा विश्वास कायम ठेवत, आरोग्यसेवेच्या नव्या युगाची सुरुवात

न्यूऐरा हॉस्पिटल्सने नागपूरच्या रामदासपेठ येथे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले.धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आलेले न्यूऐरा हॉस्पिटल आधुनिक आरोग्यसेवेतील उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून विकसित करण्यात आले

नागपूर, 24 जुलै 2026 : मध्य भारतातील आरोग्यसेवा आरोग्यसेवा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठत, न्यूऐरा हॉस्पिटल्सने आज नागपूरच्या रामदासपेठ येथे आपल्या प्रमुख अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभाची घोषणा केली. भारतातील प्रतिष्ठित उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या पगारिया समूहाच्या उद्योजकीय अनुभव आणि प्रेमजी इन्व्हेस्टच्या धोरणात्मक गुंतवणुकीच्या पाठबळावर उभारलेले न्यूऐरा हॉस्पिटल, रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण उपचारपद्धती आणि संवेदनशीलतेने जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प साकार करत आहे. या हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन समारंभाला भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय देशातील नामांकित उद्योजक, आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नागपूरच्या मध्यवर्ती रामदासपेठ परिसरात धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आलेले न्यूऐरा हॉस्पिटल हे आधुनिक आरोग्यसेवेतील उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, उच्च प्रशिक्षित परिचारिका आणि रुग्णांच्या सोयीला प्राधान्य देणारी पायाभूत सुविधा यांच्या बळावर हे हॉस्पिटल एकाच ठिकाणी सर्वसमावेशक दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देणार आहे. या प्रसंगी न्यूऐरा हॉस्पिटल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. आनंद संचेती म्हणाले न्यूऐरा हॉस्पिटल्सची स्थापना केवळ अत्याधुनिक वैद्यकीय उपचार देण्यासाठी नव्हे, तर रुग्णांचा विश्वास जपणारी, संवेदनशील आणि रुग्णकेंद्रित सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारी आरोग्यसेवा संस्था उभारण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. प्रेमजी इन्व्हेस्ट आणि पगारिया समूहाचे पाठबळ आम्हाला भविष्यातील गरजांसाठी सक्षम आणि आधुनिक आरोग्यसेवा व्यवस्था उभारण्यासाठी मदत करत आहे, ज्याचा लाभ येणाऱ्या अनेक पिढ्यांना होईल. नागपूर आणि संपूर्ण मध्य भारतातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा, उत्कृष्ट उपचार परिणाम आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा देत आरोग्यसेवेतील नवे मानदंड प्रस्थापित करण्याचे आमचे ध्येय आहे. डॉ. महेश सारडा, युनिट डायरेक्टर आणि कन्सल्टंट - क्रिटिकल केअर आणि इमर्जन्सी मेडिसिन, न्यू एरा हॉस्पिटल, रामदासपेठ न्यूऐरा हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक आयसीयू, समर्पित आपत्कालीन विभाग, केंद्रीकृत रुग्ण निरीक्षण व्यवस्था आणि स्मार्ट डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्रिटिकल केअर सेवांना अधिक सक्षम बनवण्यात आले आहे. या आधुनिक सुविधांमुळे आमची वैद्यकीय टीम रुग्णांना जलद सुरक्षित आणि अचूक उपचार देऊ शकते. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, अशावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि समन्वयाने काम करणारी तज्ज्ञ टीम रुग्णांचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. डॉ. अलंकार रामटेके, युनिट डायरेक्टर आणि कन्सल्टंट तसेच ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ न्यूऐरा हॉस्पिटल्स, रामदासपेठ म्हणाले, नागपूर आणि संपूर्ण मध्य भारतातील नागरिकांना अत्याधुनिक ऑर्थोपेडिक उपचार सुविधा देताना आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. न्यूऐरा हॉस्पिटल्समध्ये रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, फास्ट-ट्रॅक सर्जरी मिनिमली इन्वेसिव्ह (MIS) शस्त्रक्रिया क्रीडा दुखापतींवरील उपचार तसेच अत्याधुनिक ट्रॉमा केअर सुविधा उपलब्ध आहेत. प्रगत सर्जिकल रोबोट्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी सर्जन आधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आणि ट्रॉमा रुग्णांसाठी सुसज्ज ॲम्ब्युलन्स सेवांच्या माध्यमातून रुग्णांना अधिक सुरक्षित, अचूक उपचार आणि जलद बरे होण्यासाठी आम्ही जागतिक दर्जाच्या ऑर्थोपेडिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, प्रगत क्रिटिकल केअर युनिट्स आपत्कालीन आणि ट्रॉमा केअर सेवा, अत्याधुनिक निदान सुविधा, आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान तसेच विविध सुपर-स्पेशालिटी विभागांनी सुसज्ज असलेले न्यूऐरा हॉस्पिटल एकाच ठिकाणी सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देते.यासोबतच, समुदाय आरोग्य उपक्रम कॉर्पोरेट वेलनेस कार्यक्रम, शालेय आरोग्य तपासणी उपक्रम आणि नियमित आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेलाही हॉस्पिटलकडून विशेष प्राधान्य दिले जाते. वैद्यकीय उत्कृष्टता, नाविन्य, प्रामाणिकपणा, रुग्णांची सुरक्षितता आणि करुणामय सेवा या पाच प्रमुख मूल्यांवर उभारलेले न्यूऐरा हॉस्पिटल्स विदर्भ तसेच शेजारील राज्यांतील नागरिकांसाठी विश्वासार्ह आरोग्यसेवा केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. तसेच नागपूरला देशातील एक महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र म्हणून विकसित करण्यामध्येही हे हॉस्पिटल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या भव्य उद्घाटन समारंभात आरोग्यसेवा उद्योग शिक्षण क्षेत्रातील मान्यवर
वैद्यकीय तज्ज्ञ, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा मध्य भारतातील आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.