नागपूर.दि.3 फेब्रुवारी 2021ला सायंकाळी ठीक 5 वाजता राम मंदिर परिसर गुरुनानक सोसायटी वैशाली नगर हिंगणा रोड येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पुरस्कार विजेते राजू वाघ यांचा नागरी सत्कार स्थानिक नागरिकांनी आयोजित केला होता .यावेळी मंचावर जिल्हापरिषद सदस्या माननीय सुचिता विनोद ठाकरे,डीगडोह देवी ग्रामपंचायत च्या सरपंच इंद्रायणी काळबांडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश काळबांडे गुरुनानक सोसायटी अध्यक्ष सुरेंद्र शेंडे, आणि श्री घोरपडे, श्री रामचंद्र हिंगणेकर, श्री सुधाकर तातेवार मंचावर उपस्थित होते. तसेच सोसायटीतील प्रत्येक नागरिक यावेळी आवर्जून उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन प्रशांत काळने यांनी केले,तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन दिलीप पंचबुद्धे, उमराव बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सत्कारमूर्ती राजुभाऊ यांना मा. सुचिता ठाकरे,मा. इंद्रायणी आणि सुरेश कालबांडे आणि मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि *अपघातमूक्त नागपूर संकल्पनेचे प्रणेते* सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्कारमूर्ती श्री राजू वाघ यांची सत्काराच्या उत्तरात सांगितले की, सन 2001 पासून रस्ते अपघातग्रस्त जखमींना सुवर्णकाळात मदत करण्याचे कार्य करीत आहे हे कार्य 20 वर्षांपासुन अविरत आणि धान्यवादाची अपेक्षा न करता करीत आहे . आणि आता अपघातग्रसतांना मदत करण्यासोबतच वाहतूक नियम पाळणारी पिढी तयार व्हावी याकरिता योजनाबद्ध कार्य करण्याची हमी राजू वाघ यांनी उपस्थित नागरिकांना दिली.
यावेळी जिल्हापरिषद सदस्या मा. सुचितताई ठाकरे ,सरपंच इंद्रायणी काळबांडे ,आणि सुरेशजी कालबांडे यांनी आपल्या भाषणातून राजू वाघ यांना शुभेच्छा देत रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रमात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला श्री गव्हाळे काका, शहाजी मेटे सतीश करमरकर, गणेश तायडे,श्री अनिल वाघ, विद्या तंदुळकर,माया काळे, भूषण सार्वे,नितीन तातेवर,गोलू हारोडे,शबनम ठाकूर आणि समस्त नागरिक उपस्थीत होते.(दि.04/02/2021)