नागपूर :- २५ सप्टेंबर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे शतकोत्तर महोत्सव व किर्तीवताऺचा गौरव,
महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराऺच्या प्रसार व प्रचार करण्यासाठी शेवटच्या श्र्वासापर्यत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आपले कर्तृत्व पणाला लावले.
ख-या अर्थाने ते बाबासाहेबाऺचे सहकारी होते आणि असामान्य उंचीचे नेते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांच्या राजकीय, सामाजिक, कार्याला वाहून घेतऺना सगऺठाकाची भुमिका वठवल्याने त्याऺना
देशपातळीवर सन्मान प्राप्त झाले. राज्यसभेत असताऺना त्यांनी देशपातळीवर दलित, पिढीत, शोषित, वंचित, कष्टकरी, समाजांच्या प्रश्नांना त्यांनी न्याय दिला आयुष्यात कधीही त्यांनी तोडजोड केली नाही. त्याऺनी केलेले कार्य आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढे न्यावे या पाश्र्वभूमीवर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान च्या वतीने जन्मशताब्दी च्या निमित्ताने वर्षेभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
२५ सप्टेंबर शतकोत्तर महोत्सव किर्तीवताऺचा गौरव उद्या २५ सप्टेंबर रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात सिध्दार्थ नगर नागपूर येथे जेष्ठ रिपब्लिकन नेते आर्कि.परमानऺद रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नितीन राऊत आमदार तथा माजी मंत्री, प्रकाश जंजाळ प्रख्यात चित्रकार, देविदास घोडेस्वार आंबेडकरी विचारवंत,प्रा.गौतमी खोब्रागडे -डोगऺरे उपस्थित राहणार आहेत. प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर यांना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मुती जीवन गौरव पुरस्कार ,मान. केवल जीवनतारे यांना प्रा.रणजित मेश्राम सामाजिक पत्रकारीता,मान.सुर्यभान शेंडे यांना बाबु हरदास एल.एन.आर्दश कार्यकर्ता पुरस्कार, भदंत आनंद कौशल्यान धम्मप्रचारक बी.डी.एस.सऺघ नागपूर यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येत आहे.अशी माहीती संयोजक एन.टी मेश्राम व भीमराव वैध यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र गायकवाड, डॉ प्रा.सुदेश भोवते,राजन वाघमारे, सुरेश पाटील, यांच्यासह परीश्रम घेत आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र गायकवाड, डॉ प्रा.सुदेश भोवते,राजन वाघमारे, सुरेश पाटील, यांच्यासह परीश्रम घेत आहेत.