कळंबू ता. शहादा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले असून, तहसीलदारांनी संबंधित कर्मचाऱ्यांना शेती पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्याऐवजी दुष्काळग्रस्त परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी कळंबू येथील सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात आज दि.02 ऑक्टोबर 2026 रोजी सरपंच तसेच गावातील नागरिकांच्या उपस्थितीत तहसीलदार श्री संभाजी पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. सदर निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच श्री आर आर बोरसे, उपसरपंच श्री हिरालाल देवरे वि. का.से. सो. चे चेअरमन श्री रतिलाल बोरसे गायत्री उपसासिंचन योजनेचे व्हा. चेअरमन श्री लक्ष्मण बोरसे
शेतकरी श्री संजय भदाणे, श्री सुभान बोरसे, महेंद्र बोरसे हिंमत देवरे, आनंदा बोरसे, प्रकाश बोरसे, अशोक देवरे, अनिल गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.