नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

स्वर्गीय मनोहरराव गिरडे स्मृति रुग्णवाहिकेचे केंद्रीय मंत्री-नितीनजी गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

रुग्णवाहिका हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज त्यांच्या वर्धा रोड येथील निवासस्थानाच्या प्रांगणात आज हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

नागपूर दिनांक 27 मे भाजप पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष बिपिन गिरडे यांनी वाढत्या करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर करोना रुग्णांची वाहतुकीची सोय व्हावी या हेतूने आपल्या वडिलांच्या स्वर्गीय मनोहर गिरडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्राणवायूची पूर्ण सोय असलेली एक सुसज्ज रुग्ण वाहिका श्री श्री फाउंडेशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सुपूर्द केली. रुग्णवाहिका हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज त्यांच्या वर्धा रोड येथील निवासस्थानाच्या प्रांगणात आज हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. रुग्णवाहिकेची चावी बिपीन गिरडे यांनी गडकरी यांच्या हस्ते श्रीश्री फाउंडेशनचे अध्यक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांच्या स्वाधीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बिपिन गिरडे यांनी ही रुग्णवाहिका श्री श्री फाउंडेशनला दिली. गडकरी यांनी करोना संकट काळात बिपिन गिरडे यांच्या समय सूचकतेचे आणि कल्पकतेचे कौतुक केले. करूना च्या संकट काळात सर्व कार्यकर्त्यांनी जागरूक राहून काम करावे असे आवाहन केले आहे. गिरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रारंभी गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम पार पडला त्यानंतर रुग्णवाहिका हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे मंडळाचे अध्यक्ष विनोद कन्हेरे भाजप नेते रमेश गिरडे, विश्वास इंदूरकर, देवेंद्र वाडीभस्मे, प्रमोद महाजन, भास्कर खाडे, अमित कदम, प्रतीक भांदिर्गे, महेश पापडकर प्रणय पडोळे, हर्षद बोंद्रे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.(27/05/2021)